अहमदनगर

अहमदनगर ब्रेकींग: बॅंकेच्या सुरक्षा रक्षकाकडील बंदुकीतून सुटलेल्या गोळीने घेतला एकाचा जीव

अहमदनगर- बॅंकेच्या सुरक्षा रक्षकाकडील बंदुकीतून सुटलेली गोळी थेट एका ग्राहकाच्या डोक्यात घुसल्याने त्या ग्राहकाचा मृत्यू झाला आहे. अजित विजय जोशी (रा. वॉर्ड नं. 7, सार्वमत रोड, श्रीरामपूर) असे मयत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

 

श्रीरामपूर येथील अशोक सहकारी बँकेचे कर्मचारी व अधिकारी बँकेतील रक्कमेचा भरणा करण्यासाठी शिवाजी रोडवरील अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या टाऊन शाखेत आले होते. त्यांच्यासमवेत सुरक्षा रक्षक दशरथ कारभारी पूजारी होते.

 

त्याच दरम्यान बँकेच्या कामकाजासाठी अजित जोशी हे आले असता ते आपले कामकाज आटोपून पार्किंगमध्ये आपले वाहन काढत असताना अशोक बँकेचे सुरक्षा रक्षक दशरथ पुजारी यांच्याकडे लोड असलेल्या बंदुकीतून अचानकपणे गोळी सुटून जोशी यांच्या डोक्यात घुसली.

 

रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अजित जोशी यांना तातडीने रुग्णवाहिकेतून साखर कामगार रुग्णालयात हलविण्यात आले दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. यावेळी पोलीस उपअधीक्षक संदिप मिटके, पोलीस निरीक्षक संजय सानप व त्यांचा फौजफाटा तातडीने घटनास्थळी दाखल झाला.

 

ज्यांच्या बंदुकीतून गोळी सुटली ते दशरथ पुजारी यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. घटनास्थळी पंचनामा करुन पोलिसांनी घटनेची माहिती घेतली. सदरची घटना पाहण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केली होती. त्यामुळे शिवाजी रोडवरील वाहतूक ठप्प झाली होती. पोलिसांनी हळूहळू गर्दी कमी करत वाहतुक सुरळीत केली

Related Articles

Leave a Reply

Back to top button