अहमदनगर

अहमदनगर ब्रेकींग: 45 हजाराची लाच माघणाऱ्या पंचायत समितीच्या अधिकार्‍याला अटक

अहमदनगर – 50 हजार रूपये लाचेची मागणी करून 45 हजार रूपये स्वीकारण्याची तयारी दाखविल्याप्रकरणी नेवासा पंचायत समितीचे बालविकास प्रकल्प अधिकार्‍याविरूध्द नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. नगर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली. सोपान सदाशिव ढाकणे (वय 34) असे या अधिकार्‍याचे नाव आहे. लाचलुचपत विभागाने त्याला अटक केली आहे.

 

नेवासा तालुक्यातील रस्तापूर येथील तक्रारदाराचे चारचाकी वाहन (कार) हे भाडेतत्वावर नेवासा पंचायत समितीचे बालविकास प्रकल्पअधिकारी यांच्याकडे लावण्यात आले होते. सदर वाहनाचे बिल एक लाख 14 हजार 261 हे मंजूर करून त्याचा चेक तक्रारदार यांचे बँक खात्यामध्ये जमा करण्यासाठी तक्रारदार यांना दिला.

 

त्या मोबदल्यात ढाकणे यांनी तक्रारदार यांच्याकडे 50 हजार रूपयांची मागणी करून 23 जून, 2022 रोजी केलेल्या लाच मागणी पडताळणीमध्ये ढाकणे यांनी पंचासमक्ष 45 हजार रूपये स्वीकारण्याची तयारी दर्शविली म्हणून आज त्यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button