अहमदनगर

अहमदनगर ब्रेकींग: मुख्यमंत्री शिंदेंना इशारा देणार्‍या महिला पदाधिकार्‍यांवर पोलिसांकडून कारवाई

अहमदनगर- एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर शिवसेनेतून अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते शिंदे यांच्या गटात सामील होत आहेत. नगर शहरात काही दिवसांपूर्वी सेनेचे संपर्कप्रमुख भाऊ कोरगावकर यांनी बैठक घेत शहरातील नगरसेवक व पदाधिकारी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत असल्याचे सांगितले होते. त्यानंतर शिवसेनेच्या महिला पदाधिकारी स्मिता अष्टेकर यांनी बंड करणार्‍या पदाधिकारी आणि नगरसेवकांना काळे फासणार असल्याचा इशारा दिला होता. तसेच मुख्यमंत्री शिंदे यांनी नगरमध्ये लुडबुड केल्यास त्यांना देखील काळे फासणार असल्याचे अष्टेकर म्हणाल्या होत्या.

 

त्यामुळे अष्टेकर यांना शुक्रवारी सकाळी भिंगार कॅम्प पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने अष्टेकर यांच्याकडून हमीपत्र घेऊन त्यांची सुटका केली. या पार्श्वभूमीवर भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याने प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून अष्टेकर यांना कलम 151 अंतर्गत नोटीस बजावून ताब्यात घेतले. त्यांना न्यायालयासमोर हजर करून परिस्थिती निवळेपर्यंत किमान 14 दिवस स्थानाबद्द करावे, अशी मागणी पोलिसांकडून करण्यात आली होती. न्यायालयाने अष्टेकर यांच्याकडून यापुढे असे कोणतेही कृत्य होणार नाही, असे हमीपत्र घेत त्यांची सुटका केली.

Related Articles

Leave a Reply

Back to top button