अहमदनगर

अहमदनगर ब्रेकींग: पोलीस निरीक्षकाचा तरूणीवर अत्याचार

अहमदनगर- पूर्वी कोतवाली पोलीस ठाण्यात प्रभारी अधिकारी असलेल्या पोलीस निरीक्षक विकास वाघ याने तरूणीवर अत्याचार केला असल्याची घटना घडली आहे.

 

पूर्वी दाखल केलेले गुन्हे मागे घेण्यासाठी तरूणीला बळजबरीने वाहनात बसवून घेऊन जात अत्याचार केल्याची घटना शनिवारी भिंगारमध्ये घडली. यासंदर्भात पीडित तरूणीने भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून पोलीस निरीक्षकासह सहा जणांविरूध्द अत्याचारा गुन्हा दाखल झाला आहे.

 

पोलीस निरीक्षक विकास दौलतराव वाघ, त्याचा भाऊ संतोष दौलतराव वाघ, विकासची पत्नी आरती विकास वाघ, दोन मुली (सर्व रा. तपोवन रोड, समर्थ टॉवर, नाशिक) व नगर शहरात राहणारी एक महिला यांच्या विरूध्द गुन्हा दाखल झाला आहे. पीडित फिर्यादी शनिवारी दुपारी त्यांच्या दुचाकीवर कोर्टाजवळून जात असताना तेथे थांबलेल्या आरोपींनी फिर्यादी तरूणीला बळजबरीने चारचाकी वाहनात बसविले.

 

‘तु आमच्या विरूध्द दाखल केेलेले गुन्हे मागे घे’, असे म्हणून शिवीगाळ करून मारहाण केली. काटवनात घेऊन जात आरोपी यांनी तू गुन्हे मागे घेण्यासाठी अ‍ॅफेडेव्हीट करून दे, असे म्हणून दोघांनी तरूणीला धरून विकास वाघ व संतोष वाघ यांनी बळजबरीने अत्याचार केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास भिंगार कॅम्प पोलीस करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button