अहमदनगर

अहमदनगर ब्रेकींग: लाच घेताना पोलिसासह खासगी व्यक्तीला पकडले

अहमदनगर- अवैधरित्या दारू विक्री करण्यासाठी परवानगी देवून महिना 30 हजार रूपयांचा हप्ता घेणार्‍या पोलीस अंमलदार शैलेश गोमसाळे व खासगी व्यक्ती वैभव साळुंके (वय 35 रा. नगर) यांना लाचलुचपत विभागाच्या नाशिक पथकाने पकडले. त्यांच्याविरूध्द तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

 

पाईपलाईन रोडवरील एकविरा चौक परिसरात ही कारवाई करण्यात आली. तोफखाना हद्दीतील तक्रारदार यांना विना परवाना दारू विक्री करण्याची परवानगी देवून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई न करण्याच्या मोबदल्यात गोमसाळे याने खासगी व्यक्ती साळुंके यांच्यामार्फत तक्रारदाराकडे 30 हजार रूपयांची मागणी केली होती.

 

तक्रारदार यांनी नाशिक लाचलुचपत विभागाकडे तक्रार दिली होती. दिलेल्या तक्रारीवरून 21 जुलै रोजी लाच मागणी पडताळणीदरम्यान लाच मागितल्याचे सिध्द झाले होती.

 

दरम्यान आज एकविरा चौक परिसरातील सिटी स्टोअरजवळ खासगी व्यक्ती साळुंके याने गोमसाळे याच्यावतीने तक्रारदार यांच्याकडून 30 हजार रूपयांची रक्कम स्वीकारताना पथकाने रंगेहाथ पकडले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button