अहमदनगर

अहमदनगर ब्रेकींग: लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार; गर्भपातही केला

अहमदनगर- संगमनेर शहरात एका विवाहितेवर अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे. लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केला. तीचा तीन वर्षांपूर्वी घटस्फोट झाला होता.

 

याप्रकरणी एका जणाविरुद्ध संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. शहरातील एका कॉलनीत राहणार्‍या महिलेचा तीन वर्षांपूर्वी घटस्फोट झाला होता. यानंतर ती आपल्या दोन मुलांसह वडिलांकडे राहत होती. दरम्यानच्या काळात मयुर विकास जेधे याच्यासोबत तिचे प्रेमसंबंध जुळले. दोन्ही मुलांना सांभाळील व तुलाही सांभाळील आपण लग्र करू असे आमिष दाखवून त्याने सदर विवाहितेचा विश्वास संपादन केला.

 

त्याच्यावर विश्वास ठेवून आठ महिन्यांपूर्वी शहरातील गणेशनगर येथे सदर विवाहिता दोन्ही मुलांसह राहण्यासाठी गेली. याठिकाणी त्याने तिच्यासोबत वेळोवेळी शरीर संबंध ठेवले. ऑगस्टमध्ये मयुर जेधे याच्यापासून ती गर्भवती राहिली. याची माहिती समजतात मयूर याने औषध खाऊ घालून तिचा गर्भपात केला. त्यानंतर मयूर याने सदर विवाहितेस शारीरिक व मानसिक त्रास दिला.

 

या महिलेकडे असलेले पैसेही त्याने संपवले. यानंतर मयूर हा सदर विवाहिता व तिच्या दोन मुलांना सोडून गेला. संतप्त झालेल्या सदर विवाहितेने शहर पोलीस ठाण्यात मयूर जेधे याच्याविरुद्ध फिर्याद दिली.

 

पोलिसांनी या फिर्यादीवरून विविध कलमान्वये मयूर जेधे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक निकिता महाले या करीत आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button