अहमदनगर ब्रेकींग: दुचाकीच्या धडकेत निवृत्त पोलिसाचा मृत्यू

अहमदनगर- रस्ता ओलांडताना दुचाकीची धडक बसून निवृत्त पोलीस कर्मचार्याचा मृत्यू झाला. लक्ष्मण रामभाऊ साबळे (70, रा. सुपा. ता. पारनेर) असे या मृत्यू झालेल्या सेवानिवृत्त पोलिसाचे नाव आहे.अहमदनगर – पुणे महामार्गावर सुपा शिवारात हा अपघात झाला.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवारी रात्री सात ते आठच्या दरम्यान साबळे हे नगर पुणे महामार्गावर सुपा येथील सफलता हाँटेल जवळ रस्ता ओलांडून सुपा गावाच्या दिशेने येत होते. त्याच वेळी अहमदनगरहून पुण्याच्या दिशेने जात असलेल्या दुचाकीची साबळे यांना जोराची धडक बसली.
यात ते जबर जखमी झाले. त्यांना तेथील स्थानिक रहिवाशांनी तातडीने सुपा येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. परंतु तेथे त्यांना मृत घोषीत केले. गुरुवारी सकाळी शोकाकुल वातावरणात त्याच्यावर सुपा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
याबाबत सुपा पोलीस अधिक माहिती घेत असुन अपघाताची व मृत्युची प्राथमिक नोंदणी केली असुन सुपा पोलिस स्टेशचे पोलिस निरिक्षक नितीनकुमार गोकावे यांच्या मार्गदर्शनाखाली सुपा पोलिस पुढील तपास करत आहेत.