अहमदनगर

अहमदनगर ब्रेकींग: दरोडेखोरांनी लोखंडी रॉड, कोयते, चाकूने केला हल्ला; चौघे गंभीर

अहमदनगर- दरोडेखोऱ्यांच्या मारहाणीत चौघे गंभीर जखमी झाल्याची घटना पारनेर तालुक्यातील धोत्रे गावातील भांड वस्तीवर मंगळवारी मध्यरात्री घडली. जखमींवर नगर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान दरोडेखोरांनी दीड लाखाचा मुद्देमाल लूटून नेला आहे.

 

देवराम विठ्ठल भांड, बेबी देवरात भांड, विठ्ठल बबन भांड अलका बबन भांड अशी या मारहाणीत जखमी झालेल्या जखमींची नावे आहेत. याबाबत सावळेराम भांड यांनी पारनेर पोलिस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, मंगळवारी मध्यरात्रीनंतर सात ते आठ दरोडेखोरांनी लोखंडी रॉड, कोयते, चाकू यांचा धाक दाखवत दरोडेखोर घरात घुसले.

 

त्यांनी भांड कुटुंबियांना बेदम मारहाण केली. त्यांच्याकडील सोन्या चांदिचे दागिणे व रोख रक्कम घेऊन ते गेले. जाताना दुचाकीच्या काचा त्यांनी फोडल्या. तसेच दरोडेखोरांना जाताना जवळ राहणारे विठ्ठल भांड यांनाही मारहाण करून त्यांच्याकडील दागिणे तसेच पैसे लूटून नेले आहेत.

 

जखमींवर अहमदनगर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, उपअधीक्षक अजित पाटील, पारनेर पोलीस ठाण्याचे निरिक्षक घनश्याम बळप, सुपा पोलीस ठाण्याचे निरीक्षक नितीशकुमार गोकावे यांनी पथकासह घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला आहे. या घटनेने परिसरात दहशत निर्माण झाली असून तात्काळ दरोडेखोरांना पकडून कारवाई करण्याची मागणी नागरीकांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button