अहमदनगर

अहमदनगर ब्रेकींग: पैसे व सोन्याच्या दागिन्यांसाठी शिक्षकाचा खुन

अहमदनगर- पैसे व सोन्याच्या दागिन्यांसाठी शिक्षकाचा खुन केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सुरूवातीला अपघाती मृत्यू झाल्याचा बनाव करण्यात आला होता. परंतु पोलीस तपासातून तो खुन असल्याचे उघडकीस आले आहे.

 

पारनेर तालुक्यातील कर्जुले हर्या जवळील घाटात 7 नोव्हेंबर रोजी मध्यरात्री ही घटना घडली होती. या प्रकरणी पोलिसांनी दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्यातील एकाला जेरबंद करण्यात आले आहे.

 

दत्तात्रय सखाराम शिर्के (रा. कर्जुले हर्या, ता. पारनेर) असे पोलिसांनी अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. एकजण अद्याप पसार आहे. तर रविंद्रकुमार बबनराव उदावंत (रा. वासुंदेरोड, टाकळी ढोकेश्वर, ता. पारनेर) असे या घटनेत मृत्यू झालेल्या शिक्षकाचे नाव आहे. ते अकोले तालुक्यातील रुंभोडी येथे प्राथमिक शिक्षक म्हणून नोकरी करत होते.

 

रविंद्रकुमार उदावंत हे वासुंदे येथील घरून आकोलेकडे जात असताना 7 नोव्हेंबरला त्यांचा अपघात झाला होता. यासंदर्भात नरेंद्र दगडू केदार (रा. नवी मुंबई) यांनी पारनेर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी बसमधून प्रवास करतांना हा अपघात घडवतांना पाहिला होता. या गुन्ह्याचा तपास करत असतांना पारनेर पोलिस ठाण्याचे पोलीस निरिक्षक घनश्याम बळप यांना खबर्‍यामार्फत मिळालेल्या माहितीनुसार, दत्तात्रय सखाराम शिर्के याने हा खून केला असल्याचे समजले. या माहितीच्या आधारे पोलिसांनी शिर्के यास ताब्यात घेवून कसून चौकशी केली असता त्याने कबुली दिली आहे.

 

त्यानुसार उदावंत हे कासारे फाटा येथील दत्तात्रय शिर्के याच्या जत्रा हॉटेलमध्ये जेवणासाठी थांबले होते. या दरम्यान उदावंत यांच्याकडे जास्त रोकड आणि सोन्याचे दागिने असल्याचे अनेकांनी पाहिले होते. जेवण आटोपून उदावंत हे दुचाकीवरून निघाल्यानंतर दत्तात्रय शिर्के व त्याच्या सोबतच्या एकाने चार चाकी वाहनाने त्यांचा पाठलाग केला आणि एका वळणावर त्यांना पाठीमागून जोराची धडक दिली.

 

उदावंत हे खाली पडताच या दोघांनी त्यांच्याकडील ऐवज ताब्यात घेतला आणि तेथून पळ काढला. काहीवेळाने हे दोघेही तेथे आले आणि अपघातग्रस्ताला मदत करीत असल्याचे नाटक केले. उदावंत यांच्या मोटारसायकल पाठोपाठ येत असणार्‍या खासगी आराम बसमधील चालका शेजारी बसलेले नरेंद्र दगडू केदार (रा. नवी मुंबई, मुळ रा. भांडगाव, ता. पारनेर) यांनी हा खून होतांना प्रत्यक्ष पाहिला. नेकसोन कंपनीची गाडी उदावंत यांच्या मोटरसायकलचा बर्‍याच वेळ पाठलाग करत असल्याचे तसेच मोटरसायकलला धडक देण्याचा अनेक वेळा प्रयत्न केला.

 

उदावंत यांनी या धडका चुकविल्या मात्र घाटात या गाडीने मोटारसायकलला जोरदार धडक दिली. केदार यांनी लगेच याबाबत आपत्कालीन क्रमांक 112 वरून ही माहिती पोलीसांना दिली. यानंत सुत्र हालून संशयित जेरबंद झाले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button