अहमदनगर

अहमदनगर ब्रेकींग: पोलीस अधिकाऱ्याच्या गाडीखाली बॉम्ब लावणारा दहशतवादी पकडला

अहमदनगर- महाराष्ट्र दहशतवादी विरोधी पथक आणि पंजाब दहशतवादी विरोधी पथकाने शिर्डी येथे संयुक्त कारवाई करत पंजाबमधील एका पोलीस अधिकाऱ्याच्या गाडीखाली बॉम्ब लावून जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या दहशतवाद्याला अटक केली आहे. राजेंदर असे त्या दहशतवाद्याचे नाव आहे.

 

१६ ऑगस्ट रोजी पंजाब मधील पोलीस उपनिरीक्षकाच्या गाडीला IED लावून उडवण्याचा कट आखला होता. यावर पंजाब एटीएस आणी महाराष्ट्र एटीएस विरोधी पथकाने एकत्र कारवाई करत राजेंदर शिर्डी येथील हाँटेल गंगा येथून शुक्रवार (दि.१९) रोजी रात्री अटक केली आहे. आरोपीला पंजाब पोलिसांच्या ताब्यात दिले असून अधिक तपास सुरू आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button