अहमदनगर

अहमदनगर ब्रेकींग: गोळीबारात जखमी झालेल्या ‘त्या’ अभियंत्याचा अखेर मृत्यू

अहमदनगर- गोळीबारात जखमी झालेल्या शासकीय ठेकेदार इंजि. स्वप्निल जयसिंग आग्रे (वय 25) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. पारनेर तालुयातील म्हसोबा झाप येथील आग्रे यांच्यावर 27 सप्टेंबर 2022 रोजी भरदुपारी मांडओहोळ रस्त्यावरील कमळजाई मंदिराजवळ गावठी कट्टातुन तीन परप्रांतीय हल्लेखोरांनी गोळीबार करत त्यांच्यावर चार गोळ्या झाडल्या होत्या.

 

त्यांच्यावर नगर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु 39 दिवस मृत्यूशी झुंज देत म्हसोबा झाप येथील ठेकेदाराचा गुरुवारी रात्री 9 वाजता उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. या ठेकेदारावर हल्ला करणारे शक्ती नारायण राय व नितीश गुड्डू यादव व रिसु यादव या तीनही परप्रांतीय हल्लेखोरांना ताब्यात घेतले आहे.

 

आर्थिक व्यवहारातूनच की अन्य कारणांमुळे हा हल्ला झाला याचा तपास पारनेर पोलीस करत आहेत. या परप्रांतीय हल्लेखोराकडुंन गावठी कट्टा व दोन गोळ्या जप्त करण्यात आल्या असून घटनास्थळी तीन पुंगळ्या आढळलेले आहे. परंतु या जखमीच्या पोटामध्ये शस्त्रक्रिया केल्यानंतर चार गोळ्या आढळून आल्या. एक पुंगळीचा शोध पोलीस घेत आहे. हे हल्लेखोर परप्रांतीय असून आर्थिक देवाण-घेवाणीतून हा हल्ला झाला असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

 

हल्ला करून हे तिघेजण पसार होण्याच्या बेतात असतांना तीन पैकी दोन जणांना वारणवाडी सब स्टेशन जवळ पिस्तूल सहित वारणवाडी ग्रामस्थांनी पकडुन पारनेर पोलिसांच्या ताब्यात दिले होते. तर त्या परप्रांतीय हल्लेखोरांतील एक जण फरार झाला होता. नारायणगाव हद्दीमध्ये तिसर्‍या आरोपीला जेरबंद केले आहे. पुढील तपास पोलीसांनी सुरू केला आहे. या अभियंत्याच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button