अहमदनगर

अहमदनगर ब्रेकींग: शिवसेनेत प्रवेश करताच ‘या’ नेत्याला धमकीचे पत्र

अहमदनगर- दोन दिवसांपूर्वी अशोक गायकवाड यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन शिवसेनेत प्रवेश केला. यानंतर त्यांना आज पोस्टाद्वारे एक पत्र आले असून या पत्रामध्ये गायकवाड यांना दोन कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आली आहे.

 

पैसे दिले नाही तर तुझा मुसेवाला करू, अशी धमकीही पत्रात देण्यात आली आहे. हे पत्र नीनावी असून याबाबत तोफखाना पोलीस ठाण्यामध्ये गायकवाड यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.यापूर्वीही गायकवाड यांना असेच एक पत्र आले होते.

 

गायकवाड यांनी दोन दिवसांपूर्वीच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन शिवसेनेत प्रवेश केला होता. यानंतर त्यांना धमकी आल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये खळबळ उडाली आहे. याबाबत गायकवाड हे जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांची आज, बुधवारी भेट घेणार असून वारंवार हे प्रकार होत असल्याने याबाबत सखोल चौकशी करण्याचे मागणी ते जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे करणार आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button