अहमदनगर

अहमदनगर ब्रेकींग: वसतिगृहातील तीन अल्पवयीन मुलांना पळविले

अहमदनगर-वसतिगृहातून तीन अल्पवयीन मुलांना कोणीतरी फूस लावून पळवून नेले. ही घटना नगर शहरातील यतीमखाना अ‍ॅण्ड बोर्डींग मुलांचे वसतिगृह येथे घडली आहे.

 

या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात वसतिगृहाचे अधीक्षक गुफरान रफिक शेख (वय 34 रा. मुन्सीपल हाडको, टिव्ही सेंटर, सावेडी) यांनी फिर्याद दिली आहे. गुन्हा दाखल झाला आहे.

 

शहरातील जुनी महानगरपालिकेसमोर यतीमखाना अ‍ॅण्ड बोर्डींग मुलांचे वसतिगृह आहे. याठिकाणी मागील दोन वर्षापासून कामटीपुरा (ता. शिरूर, जि. पुणे) येथील दोघे व सिध्दार्थनगर, शिरूर (ता. शिरूर, पुणे) येथील एक असे तीन अल्पवयीन मुले शिक्षणाकरीता राहत आहे.

 

बुधवारी सायंकाळी आरबी क्लास संपल्यानंतर वसतिगृहामध्ये जेवण होते. त्यावेळी वसतिगृहातील इतर मुले जेवण करण्यासाठी हजर होती मात्र तीन मुले तेथे हजर नसल्याने अधीक्षक शेख यांनी त्या मुलांचा सर्वत्र शोध घेतला पंरतू ते मिळून आली नाही. त्यानंतर अधीक्षक शेख यांनी मुलांच्या पालकांना फोन करून सदर मुलांबाबत विचारले असता त्यांनी मुल घरी आले नसल्याबाबत सांगितले.

 

त्यानंतर अधीक्षक शेख व त्यांच्या कर्मचार्‍यांनी नगर शहरात तिन्ही मुलांचा शोध घेतला असता ते मिळून न आल्याने कोतवाली पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीने तीन मुलांना फूस लावुन पळवून नेले असल्याची फिर्याद दाखल झाली आहे. पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button