अहमदनगर

अहमदनगर ब्रेकींग: भीषण अपघातात तीन तरूण ठार

अहमदनगर- ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरला धडकून तीन तरूणांचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना दौंड-पाटस रोडवर रविवारी रात्री घडली आहे. मयत तरूण हे काष्टी (ता. श्रीगोंदा) येथील रहिवासी असल्याचे समजते.

 

घटनेची माहिती मिळताच काष्टी गावावर शोककळा पसरली आहे. मृतामध्ये ऋषिकेश मोरे, स्वप्निल मनुचार्य आणि गणेश शिंदे यांचा समावेश आहे.

 

ट्रॅक्टर-ट्रॉलीमधून ऊसाची धोकादायक पद्धतीने वाहतूक केली जात आहे. ट्रॉलीला पाठीमागील बाजूस रिफ्लेक्टर लावलेली नसतात. त्यामुळे वाहन चालकास अंदाज येत नाही. यातून भीषण अपघात होऊन अनेकांना जीव गमावा लागतो.

Related Articles

Leave a Reply

Back to top button