अकोलेअहमदनगरकर्जतकोपरगावजामखेडताज्या बातम्यानेवासापाथर्डीपारनेरराहाताराहुरीशेवगावश्रीगोंदाश्रीरामपूरसंगमनेर

अहमदनगर ब्रेकिंग : अहमदनगर जिल्ह्यातील ह्या अधिकारी आणि कर्मचार्‍यांच्या बदल्या !

नगर जिल्हा परिषदेच्या कर्मचार्‍यांची वार्षिक बदली प्रक्रिया मंगळवार (दि.9) पासून सुरू झाल्या आहेत. पहिल्याच दिवशी सेवाज्येष्ठतेनुसार सामान्य प्रशासन, अर्थ विभाग आणि कृषी विभागातील पात्र कर्मचार्‍यांच्या प्रशासकीय, विनंती आणि आपसी बदल्यांची प्रक्रिया पारपडली. पहिल्या दिवशी 51 कर्मचार्‍यांच्या बदल्या झालेल्या आहेत.

विनंती बदली पात्र असणारे कर्मचारी नगर मुख्यालयात अथवा तालुका पातळीवर रिक्त असणार्‍या जागा तपशील पाहून कोणत्याही ठिकाणी, तालुका कोणताही असो केवळ पाणी पुरवठा आणि लघू पाटंबंधारे विभागातील रिक्त जागांची मागणी करत होते.

ही मागणी पाहून सुरूवातील आवक झालेले मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी त्यानंतर एकतर पंचायत समिती मागा अन्यथा संबंधीत पंचायत समिती अथवा मुख्यालयातील आरोग्य, शिक्षणमधील रिक्त भरण्यास सुरूवात केली. यामुळे अनेक कर्मचारी विनंती बदलीसाठी पात्र असतांनाही त्यांनतर त्यांनी बदलीस नाकार दिला.

दली प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी उपस्थितीत कर्मचार्‍यांना बनावट अपंग, वैद्यकीय यासह अन्य प्रमाणपत्रांचा आधार घेवून बदली प्रक्रियेत सहभागी होऊ नका. यासाठी मी पुन्हा संधी देत असून अशी प्रमाणपत्र असल्याचा संशय असला तरी आताच बदलीच्या प्रक्रियेतून माघार घ्या.

अन्यथा बनावट प्रमाणपत्रांच्या आधारे बदलीत सुट अथवा बदली करून घेतल्यास येत्या 15 दिवसांत संबंधित प्रमाणपत्र संबंधित यंत्रणा यांच्याकडून तपासून सादर करावे लागणार आहे.

त्यानंतर जर खोटेपणा अथवा प्रमाणपत्रांचा बनावटपणा उघड झाल्यास संबंधित कर्मचार्‍यांचे निलंबन तर करण्यात येईल, तसेच वेळ पडल्यास त्याला सेवेतून बडतर्फ करण्याचा गंभीर इशारा मुख्य कार्यकारी अधिकारी येरेकर यांनी दिला. त्यानंतर बदल्यांची नियमित प्रक्रिया पारपडली.

आधी सामान्य प्रशासन विभागातील रिक्त जागांनूसार प्रशासकीय, त्यानंतर विनंती आणि शेवटी आपसी बदल्या करण्यात आल्या. यावेळी बदली पात्र कर्मचार्‍यांनी तालुक्याच्या ठिकाणी बदलीसाठी पंचायत समितीची मागणी करत्यावेळी संबंधीत पंचायत समितीमधील विभागांची थेट मागणी केली.

मात्र, त्या ठिकाणी असणार्‍या रिक्त जागांचा तपाशील पाहून प्रशासनाने त्यांच्या सोईनूसार रिक्त जागांवर नेमणूकांचे आदेश दिले. या प्रक्रियेत काही ठिकाणी युशी तर काही ठिकाणी गम दिसून आला.

मंगळवारी झालेल्या बदल्या
सामन्य प्रशासन विभाग- सहायक प्रशासन अधिकारी प्रशासकीय आणि विनंती प्रत्येकी 1, कनिष्ठ अधिकारी (प्रशासन) विनंती 1, आपसी 2, वरिष्ठ सहायक (लिपिक) प्रशासकीय 4, विनंती 3, आपसी 1, कनिष्ठ सहायक (लिपिक) प्रशासकीय 2, विनंती 23, आपसी 6 असे एकूण 44. अर्थ विभाग सहायक लेखा अधिकारी प्रशासकीय 1, विनंती 1, कनिष्ठ लेखाधिकारी प्रशासकीय 1, वरिष्ठ सहायक (लेखा) प्रशासकीय 1, कनिष्ठ सहायक लेखा प्रशसकीय 1 आणि विनंती असे एकूण 6. कृषी विभाग विस्तार अधिकारी (कृषी) प्रशासकीय 1 अशा एकूण 51 बदल्या.

Related Articles

Leave a Reply

Back to top button