अहमदनगर

अहमदनगर ब्रेकींग:लष्कराच्या भरतीत कॉपी करताना दोघांना रंगेहाथ पकडले

अहमदनगर- हरियाणा राज्यातील दोघांना नगरमध्ये लष्कराच्या विविध पदांच्या भरतीसाठी आयोजित लेखी परीक्षेत इलेक्ट्रॉनिक साहित्याची आधारे कॉपी करताना पकडण्यात आले. रवी रमेश संधू (वय २२, जि. हिस्सार, हरियाणा) व पूजा सुरेंद्र जलंदरा (वय २२, जि. जिढप, हरियाणा) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

 

दोघांविरूद्ध भिंगार -कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नगर जवळील भिंगार येथे असलेल्या लष्करी विभागात विविध पदांची भरती प्रक्रिया सुरू आहे. या भरती प्रक्रियेसाठी लेखी परीक्षा रविवारी (ता.२८) सकाळी १० ते दुपारी १२ या कालावधीत आर्मी पब्लिक स्कूलमध्ये घेण्यात आली. या परीक्षेदरम्यान दोन्ही परीक्षार्थीनी ब्ल्यूटूथ तसेच इलेक्ट्रीक डिव्हाईसच्या मदतीने कॉपी करण्याचा प्रयत्न आढळून आले.

 

ही बाब परीक्षा हॉलमध्ये नियुक्त असलेल्या लष्करी अधिकाऱ्यांच्या लक्षात आली. त्यामुळे त्यांनी त्या दोघांना रंगेहाथ पकडले.

 

याबाबत कर्नल एल. सी. कटोजा यांनी भिंगार- कॅम्प पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीवरून आरोपी रवी रमेश संधू (वय २२, जि. हिस्सार, हरियाणा) व पूजा सुरेंद्र जलंदरा (वय २२, जि. जिढप, हरियाणा) यांच्याविरूद्ध फसवणूक आणि विद्यापीठ अधिनियम १९९४ चे कलम ७ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पोलिस उपनिरीक्षक किरण साळुंके पुढील तपास करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button