अहमदनगर

अहमदनगर ब्रेकींग: शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक करायला निघाले अन् दोघांनी 37 लाख गमावले

अहमदनगर- फॉरेक्स शेअर ट्रेडिंगमध्ये पैसे गुंतविल्यास जादा नफा मिळवून देण्याचे आमिषाने दोघांना 37 लाख रूपयांचा ऑनलाईन गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

राहुरी तालुक्यातील कुक्कडवेढे येथील एका व्यावसायिकाने फिर्याद दिली आहे. या व्यावसायिकाचा नगरमधील मित्र यांना त्यांच्या एका मित्राच्या ओळखीचे असणारे दोन अज्ञात व्यक्तींच्या व्हॉटस्अ‍ॅपवर मेसेज पाठवून फॉरेक्स शेअर ट्रेंडिंगबाबत माहिती दिली. यामध्ये पैसे गुंतवल्यास जादा प्रमाणात नफा मिळवून देण्याचे अमिष दाखविले.

 

कुक्कडवेढे येथील एका व्यावसायिक आणि त्यांच्या मित्र परिवाराने अनेक महिने चॅटिंग केले. विश्वास संपादन केला. त्यानंतर व्हॉटस्अ‍ॅपवर विविध बँकांच्या खात्यावर ऑनलाईन पैसे पाठविण्यास सांगितले. या दोघांनी 30 जूनपासून 25 ऑक्टोबरपर्यंंत या दोघांनी वेळोवेळी सुमारे 37 लाख रुपये ऑनलाईन पद्धतीने पाठविले. त्यानंतर मात्र या व्यक्तींनी त्यांच्याशी संपर्क करण्यास टाळाटाळ सुरू केली. गेल्या काही दिवसांपासून त्यांचा संपर्क होत नसल्याने आपली फसवणूक झाल्याची खात्री झाली. त्यांनी गुरुवारी (ता.1) अहमदनगरच्या सायबर पोलिस ठाण्यात येऊन फिर्याद दिली.

Related Articles

Leave a Reply

Back to top button