अहमदनगर

अहमदनगर ब्रेकींग: पत्नीचा खून, पतीला न्यायालयाने दिली ही शिक्षा

अहमदनगर- पतीने आपल्या पत्नीचा उशीने तोंड दाबून गळा आवळून व विजेचा शॉक देऊन निर्घृणपणे खून केला. याप्रकरणी जिल्हा सत्र न्यायालयाने या नराधम आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली तर मयताच्या सासू व दिराची पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता केली आहे.

 

दुसर्‍यांदा गरोदर असलेल्या पत्नीला गर्भपात करण्यास सांगितले असता तीने नकार दिला. त्यामुळे संतापलेल्या भाऊसाहेब संभाजी कदम (राहणार पाथरे बु. ता. राहाता) यांची मुलगी वर्षा बाळासाहेब पिलगर (वय 27, राहणार आश्वी बुद्रुक तालुका संगमनेर) हि दुसर्‍यांदा गरोदर राहिली होती. परंतु पती बाळासाहेब भिकाजी पिलगर, सासू लिलाबाई भिकाजी पिलगर, दीर सुरेश भिकाजी पिलगर यांचा याला विरोध होता. वर्षा हिने गर्भपात करावा यासाठी यांनी मयत वर्षावर दबाव आणला. परंतु तिने विरोध केल्याने याचा राग मनात धरून पती बाळासाहेब, दीर सुरेश व सासू लिलाबाई यांनी दिनांक 30 जुलै 2020 रोजी राहत्या घरात वर्षा हिचे उशीने तोंड दाबून व बोटाला वायर जोडून विजेचा शॉक दिला. यात वर्षा हिचा मृत्यू झाला. याप्रकरणी मयताचे वडील भाऊसाहेब कदम यांनी आश्वी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

 

 

पोलिसांनी याप्रकरणी पतीसह वरील दोघांवर गुन्हा रजिस्टर नं. 54/2916 भादवी कलम 302, 498(अ), 323, 34 प्रमाणे दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास स. पो. नि. योगेश कामाले, हवालदार तात्याराव वाघमारे यांनी करून भक्कम पुरावे गोळा केले. याप्रकरणी 12 साक्षिदार करण्यात आले. प्रत्यक्ष खटला सुरू झाल्यानंतर 10 साक्षीदारांनी महत्त्वाची साक्ष दिली. तसेच सरकारी वकील मच्छिंद्र गवते यांनी जोरदार युक्तिवाद करत न्यायालयासमोर भक्कमपणे बाजू मांडली.

 

प्रवरा हॉस्पिटलचे वैद्यकीय अधिकारी, स. पो. नि. योगेश कामाले यांची साक्ष महत्त्वाची ठरली. जिल्हा न्यायाधीश वाय. पी. मनाठकर यांनी सर्व साक्षी पुराव्याची खात्री करून आरोपी पती बाळासाहेब पिलगर यास दोषी ठरवत जन्मठेपेची व 20 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. तर इतर आरोपींची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली.

 

सदर खटल्यात सरकारी वकील मच्छिंद्र गवते यांना पो. कॉ. सारिका डोंगरे, कॉ. सुनील सरोदे, प्रविण डावरे, चंद्रकांत तोर्वेकर, दिपाली दवंगे, स्वाती नाईकवाडी, एकनाथ खाडे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button