अहमदनगर

अहमदनगर ब्रेकींग: पत्नीच्या खुन करणाऱ्या पतीस जन्मठेप

अहमदनगर- उशिने तोंड दाबून पत्नीचा खुन करणार्‍या पतीस श्रीगोंदा येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश एन. जी. शुक्ल यांनी जन्मठेप तसेच पंधरा हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. भाऊसाहेब दत्तु शेळके (रा. शेळकेवस्ती, ता. कर्जत) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे.

 

आरोपी भाऊसाहेब शेळके हा पत्नी रूपालीच्या चारीत्र्यावर संशय घेऊन, छळ करुन मारहाण करीत होता. 1 जुलै 2021 रोजी भाऊसाहेब याने रूपालीच्या तोंडावर उशी दाबून तसेच तीचा गळा दाबून तीचा खून केला. तपास चालू असताना रूपालीची सुसाईडनोट पोलीसांना मिळाली होती. तपास करून सपोनि आर. बी. शिंदे यांनी देषारोपपत्र दाखल केले होते.

 

या खटल्याची सुनावणी न्या. एन. जी. शुक्ल यांच्या न्यायालयात झाली. सदर खटल्यामध्ये सरकार पक्षाच्या वतीने सात साक्षीदार तपासले. त्यांच्या साक्षी महत्वाच्या ठरल्या. सरकार पक्षाच्या वतीने अतिरीक्त सरकारी वकील अनिल एम. घोडके यांनी काम पाहिले.

 

मा. न्यायालयासमोर आलेला साक्षी पुरावा व सरकारी वकीलांचा युक्तिवाद ग्राह्य धरुन मा न्यायालयाने भाऊसाहेब यास जन्मठेप, 15 हजाराचा दंड, दंड न भरल्यास 1 वर्षे साधी कैदेची शिक्षा तसेच छळ प्रकरणी 3 वर्षे शिक्षा तसेच 5 हजार रूपये दंड, दंड न भरल्यास 6 महीने साधी कारावास शिक्षा सुनावली.

Related Articles

Leave a Reply

Back to top button