अहमदनगर

अहमदनगर ब्रेकींग: महिलेला गुंगीचे औषध देऊन अत्याचार; फोटो सोशल मीडियावर…

अहमदनगर- सोशल मीडियावर ओळख झालेल्या महिलेला गुंगीचे औषध देऊन अत्याचार केल्याची धक्कादायक घटना पाथर्डी तालुक्यात घडली.

 

दीड महिन्यांपूर्वी सोशल माध्यम इन्स्टाग्रामवर एका महिलेची तरूणासोबत ओळख झाली. त्या तरूणाने महिलेला जेवणाच्या बहाण्याने हॉटेलमध्ये बोलवून पेयातून गुंगीचे औषध देऊन अत्याचार केला. तसेच अश्लिल फोटो समाज माध्यमावर प्रसारीत करून महिलेची बदनामी केली. पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून याप्रकरणी पाथर्डी पोलिसांनी एकावर गुन्हा दाखल केला आहे.

 

सचिन सारुक (रा.येळी, ता. पाथर्डी) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयिताचे नाव आहे. पीडित महिलेने पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे, संशयित सारुक व पीडितेची इन्स्टाग्रामवर तीन महिन्यांपूर्वी ओळख झाली होती. फोनवरील संभाषण वाढून अधिक ओळख झाल्यानंतर 6 जुलै 2022 रोजी दोघांची पाथर्डीत बसस्थानकावर भेट झाली. तेथुन जेवणासाठी शेवगाव रस्त्यावरील एका हॉटेलमधे दोघे गेले. तेथे थंड पेयातून पिडीतेस गुंगीचे औषध देण्यात आले.

 

 

आरामाच्या कारणाने हॉटेलच्या लॉजच्या खोलीत पिडीतेस नेऊन संशयित सारूक याने तिच्यावर अत्याचार केले. यावेळी त्याने दोघांचेही नको त्या अवस्थेतील अश्लिले फोटो काढून ठेवले. यानंतर पुन्हा पिडीतेस त्याने बोलवण्याचा प्रयत्न केला. परंतु पिडीतने नकार देताच संशयिताने ते फोटो सोशल माध्यमांवर प्रसारीत करून तिची बदनामी केली.

 

पाथर्डी पोलिसांनी संशयित सचिन सारुक यावर अत्याचार, धमकी देणे व माहीती तंत्रज्ञान अधिनियम 2008 चे कलम 67 (ए) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पोलिस निरीक्षक सुहास चव्हाण तपास करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button