अहमदनगर ब्रेकींग: महिलेचा खुन करून मृतदेह पडीक शेतात आणून टाकला

अहमदनगर- सिमेंटचा ब्लॉक डोक्यात घालून महिलेचा खून करून मृतदेह रेल्वे स्टेशन ते आगरकर मळा रोडवरील पडीक शेतामध्ये आणून टाकल्याची घटना समोर आली आहे. खुन झालेल्या महिलेची ओळख पटली नाही. ती 35 ते 40 वर्षीय वयोगटातील असल्याची माहिती पोलिसांनी दिली. यासंदर्भात कोतवाली पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे.
मंगळवारी सकाळी इंगळे वस्ती, रेल्वेस्टेशनच्या पश्चिमेस असणार्या मोकळ्या पडीक शेतात एका 35 ते 40 वर्ष वयोगटातील महिलेचा मृतदेह असल्याची माहिती कोतवाली पोलिसांना माहिती होती.
त्यांनी घटनास्थळी धाव घेतली असता रस्त्यापासून सुमारे 100 ते 150 मीटर अंतरावर आतमध्ये एका महिलेचा मृतदेह आढळून आला. सदर महिलेच्या चेहरा हा रक्ताने माखलेला होता. मृतदेहा शेजारी एक सिमेंट ब्लॉक पडलेला होता. त्याला सुध्दा रक्त लागल्याचे दिसुन आले. कोणीतरी अज्ञात इसमाने काहीतरी कारणावरून सिमेंटचा ब्लॉक डोक्यात घालून खुन केल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला असून महिलेची ओळख पटविण्याचे काम सुरू केले आहे.