अहमदनगर

अहमदनगर ब्रेकींग: मासे विक्री करणाऱ्या महिलेवर कोयत्याने हल्ला

अहमदनगर- पारनेर तालुक्यातील मांडवे खुर्द येथील रामभाऊ गागरे या व्यक्तीने मासे विक्री करणाऱ्या आदिवासी महिलेने कमी किंमतीमध्ये मासे दिले नाही. हे कारण काढून त्या आदिवासी महिलेवर धारदार कोयत्याने मारहाण केली आहे.

 

सदर आदिवासी महिलेला टाकळी ढोकेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या संपूर्ण घटनेचा पुढील तपास पारनेर पोलीस निरीक्षक घनश्याम बळप यांच्या मार्गदर्शनाखाली टाकळी ढोकेश्वरचे पोलीस करत आहेत.

 

मांडवे खुर्द येथे हल्ला करणाऱ्या त्या व्यक्ती विरोधात पारनेर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्या व्यक्तीस तात्काळ अटक करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे. त्या संदर्भात निवेदन शबरी माता भिल्ल, आदीवासी विकास संस्था महाराष्ट्र यांच्या तर्फे पारनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक घनश्याम बळप यांना देण्यात आले आहे.

 

सदर आरोपीस तात्काळ अटक करावी अशी मागणी शबरी माता भिल्ल, आदीवासी विकास संस्था यांच्या वतीने करण्यात आली आहे. यावेळी शबरी माता भिल्ल आदिवासी विकास संस्था अध्यक्ष दीपक बर्डे, तसेच मोहन माळी, भिमाजी भांगरे, विकास बर्डे, अनिल पवार, पांडुरंग पवार, शांताराम गायकवाड, अरुण बर्डे, यांच्यासह शबरी माता भिल्ल आदिवासी विकास संस्था संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Back to top button