अहमदनगर

अहमदनगर ब्रेकींग: लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर दीड वर्षे अत्याचार

अहमदनगर- औरंगाबाद येथील एका व्यक्तीने नगर शहरात राहणार्‍या महिलेला लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. त्या व्यक्तीकडून महिलेवर दीड वर्ष वेळोवेळी अत्याचार केला आहे.

 

महिलेच्या फिर्यादीरून तोफखाना पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. प्रमोद नीळकंठ शिरसाठ (वय 60 रा. औरंगाबाद) याच्यावर हा अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला आहे.

 

महिलेची शिरसाठसोबत ओळख होती. त्या ओळखीचा त्याने फायदा घेत जानेवारी 2020 मध्ये महिलेच्या घरी मुक्काम केला. महिलेवर बळजबरीने अत्याचार केला. शिरसाठने लग्न करण्याचे आमिष दाखवले. शिरूर बसस्थानकाजवळील साई सवेरा हॉटेलच्या लॉजमध्ये वेळोवेळी अत्याचार केला. त्याने महिलेसोबत लग्न करण्याचे टाळाटाळ करून फसवणूक केली. आता या गुन्ह्याचा तपास तोफखाना पोलीस करणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button