अहमदनगर

अहमदनगर ब्रेकींग: खोटी आश्वासनं देऊन तरूणीवर अत्याचार

अहमदनगर- खोटी आश्वासनं देऊन तरूणीवर अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. तुझ्याशी लग्न करेल, तुला सांभाळेल तसेच तुला आयुष्यभर साथ देईल, असे वेळोवेळी आश्वासन देऊन गैरफायदा घेतल्याचे तिच्या लक्षात आल्यानंतर सदर तरूणीने श्रीरामपूर शहर पोलिसांकडे धाव घेतली आहे.

 

याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात पाच जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सन 2020-21 ते 2022 च्या दरम्यान बाळासाहेब हरदास याने सदर तरुणीस तुझ्याशी लग्न करेल, तुला सांभाळेल तसेच तुला आयुष्यभर साथ देईल, असे वेळोवेळी आश्वासन देऊन या तरुणीवर अत्याचार केला.

 

केवळ या तरुणीला खोटी आश्वासनं देऊन तिच्यावर अत्याचार करून तिचा गैरफायदा घेतला. आपल्याला फसवून अत्याचार करत असल्याचे तरुणीच्या लक्षात येताच सदर पीडित तरुणीने श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात जाऊन सदरचा प्रकार कथन केला.

 

या पीडित तरुणीने श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी बाळासाहेब हरदास, त्याची पत्नी, मुलगा, मुलगी व जावई यांच्याविरुध्द भादंवि कलम 376, 323, 506 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक समाधान सुरवडे हे करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button