अहमदनगर

अहमदनगर ब्रेकींग: लग्नासाठी तरूणीचा तरूणाच्या घरी थयथयाट; नेमकं काय घडलं

अहमदनगर- तरूणीने लग्नासाठी मुलाच्या घरी येऊन, आई-वडिलांना शिवीगाळ केली. तुमच्या मुलाचे माझ्याशी लग्न करून न दिल्यास आत्महत्या करण्याची धमकी दिली आहे. इंस्टाग्राम या सोशल मीडियावर तरूणासोबत ओळख झालेल्या एका तरूणीने हे कृत्य केले आहे.

 

मुलीच्या या कृत्यामुळे मुलाच्या घरच्यांनी तिला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. याप्रकरणी त्या तरूणीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कुणाल श्रेणिक शाह (वय 25, रा. स्वीट कॉर्नरसमोर, आगरकरमळा) हे सराफ व्यावसायिक आहेत. इंस्टाग्राम या सोशल मीडियावर सुमारे आठ महिन्यापूर्वी त्यांची आलमगीर (भिंगार) येथील एका तरूणीशी ओळख झाली.

 

या ओळखीतून मुलीने त्यांच्याकडे लग्न करण्याची मागणी घातली. कुणाल यांनी लग्न करण्यास नकार दिल्यावर तरूणीने भिंगार पोलीस ठाणे आणि न्यायालयात अत्याचाराची तक्रार दाखल केली. या प्रकरणांमध्ये कुणाल यांचा जबाब नोंदविण्यात आलेला आहे. परंतु, त्यांनी तरूणीची गैरवर्तन केल्यास केलेले नसल्यामुळे ते बिनधास्त होते.

 

संबंधित तरूणी गुरूवारी दुपारी दोन वाजता कुणाल यांच्या घरी आली. तिने हातामध्ये ब्लेड आणले होते. माझे कुणाल बरोबर लग्न लावून द्या, नाहीतर मी जीवाचे बरे वाईट करून घेईल, अशी धमकी तिने दिली. कुणाल यांच्या आईने तिला पकडण्याचा प्रयत्न केला असता, तिने मारहाण केली तसेच वडिलांनाही शिवीगाळ केली. लग्न लावून न दिल्यास आत्महत्या करण्याची धमकी दिली आहे. याप्रकरणी मुलीला कोतवाली पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. तिच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button