अहमदनगर

अहमदनगर ब्रेकींग: विजेच्या धक्क्याने तरूणाचा मृत्यू

अहमदनगर- राहाता तालुक्यातील कोर्‍हाळे येथे विजेचा धक्का बसुन तरूणाचा मृत्यु झाला आहे. अमोल आनंदगिर गोसावी (वय 40) रा. कोर्‍हाळे असे या मयत तरूणाचे नाव आहे.

 

तो कोर्‍हाळे येथील न्यु. इंग्लिश स्कूल समोर विजेचे काम करत असताना त्यास विजेचा धक्का लागल्याने त्यांना खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. औषधोपचारापुर्वीच तो मयत झाला आहे. वैद्यकीय अधिकार्‍यांच्या खबरीवरुन राहाता पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. पुढील तपास पोलीस नाईक एस. बी. नरोडे करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button