अहमदनगरपाथर्डी

अहमदनगर ब्रेकिंग : उड्डाणपुलावरुन पडल्याने तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

पाथर्डी तालुक्यातील चिंचपूर इजदे येथील एक २१ वर्षीय युवकाचा अहमदनगर शहरातील उड्डाणपुलावरून खाली पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (दि. १८) सकाळी ११.३० च्या सुमारास स्टेट बँक चौक ते चांदणी चौकादरम्यान असणा-या वळणावर घडली.

अहमदनगर शहरातल्या चांदणी चौक ते स्टेट बँक चौका दरम्यान उड्डाणपुलाला असलेल्या धोकादायक वळणावर दुचाकीवरचे नियंत्रण सुटल्याने अहमदनगर जिल्ह्यातल्या शेवगाव तालुक्यातला रहिवासी असलेल्या एका तरुणाचा मृत्यू झाला आहे.

पाथर्डी तालुक्यातील चिंचपूर इजदे येथील एक २१ वर्षीय युवकाचा अहमदनगर शहरातील उड्डाणपुलावरून खाली पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (दि. १८) सकाळी ११.३० च्या सुमारास स्टेट बँक चौक ते चांदणी चौकादरम्यान असणा-या वळणावर घडली.

संकेत राजेंद्र डोळे (वय २१, चिंचपूर पांगुळ ता. पाथर्डी हे.मु शहर टाकळी, ता. शेवगाव) असे या मयत झालेल्या युवकाचे नाव आहे. हा मुलगा नगर तालुक्यातील वाळकी येथील धर्मनाथ शैक्षणिक प्रतिष्ठानच्या एन. डी. कासार फार्मसी कॉलेजमध्ये द्वितीय वर्षात शिक्षण घेत होता.

मंगळवारी (दि. १८) सकाळी ११.३० च्या सुमारास यामाहा कंपनीच्या एफ. झेड. मोटारसायकलवर नगरमार्गे वाळकीकडे जात असताना उड्डाणपुलावरील स्टेट बँक चौक ते चांदणी चौकादरम्यान असलेल्या वळणावर आला असता त्याचा तोल गेल्याने तो उड्डाणपुलावरून खाली पडला.

त्याची दुचाकी मात्र उड्डाणपुलावरच राहिली. उड्डाणपुलावरून खाली पडल्याने तो गंभीर जखमी झाला. त्याला उपस्थित नागरिकांनी उपचारासाठी त्वरीत या अपघातानंतर रेल्वेस्टेशन रस्त्यालगतच्या श्रीदीप हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केलं होते मात्र उपचारादरम्यानच तो मरण पावला. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

या संदर्भात भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूच्या घटनेची नोंद करण्यात आली आहे. हा तरुण पुण्याकडे अत्यंत वेगात जात असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितलंय. या तरुणाच्या दुचकीचा वेग ताशी 80 किलोमीटर असा होता. चांदणी चौक ते स्टेट बँक चौक यादरम्यान या उड्डाणपुलाला मोठे धोकादायक वळण आहे.

त्या वळणावर संकेत डोळे या तरुणाचं दुचाकीवरचं नियंत्रण सुटलं. त्यामुळे तो जोरात उडून खाली पडला तर त्याची दुचाकी उड्डाणपुलावरच राहिली. या परिसरात थांबलेल्या काही रिक्षा चालकांनी त्या तरुणाला ताबडतोब श्री दीप हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेलं. मात्र तेथे त्याची प्राणज्योत मालवली.

  • अहमदनगर ब्रेकिंग न्यूजच्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये जॉईन होण्यासाठी इथे क्लिक करा
  • अहमदनगरच्या आणखी बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा
  • तसेच आमचे फेसबुक पेज लाईक करा आणि ट्विटर वर फॉलो करा

Related Articles

Leave a Reply

Back to top button