अहमदनगर
अहमदनगर ब्रेकींग: रेल्वेच्या धडकेत युवकाचा मृत्यू

अहमदनगर- रेल्वेगाडीची धडक बसून 25 ते 27 वर्षीय अज्ञात युवकाचा मृत्यू झाल्याची घटना रांजणगाव रोड शिवारात घडली आहे. याबाबत रांजणगाव रोड रेल्वे स्टेशनचे स्टेशन मास्तर यांनी सुपा पोलिस स्टेशना फिर्याद दिली आहे.
दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, बुधवार सकाळी रेल्वे गाडी क्रमांक 12114 या गरीब रथ रेल्वेचे लोडो पायलट यांनी रेल्वे रुळ क्रमांक अप- 323/ 16-18 च्या दरम्यान एका अनोळखी युवकास रेल्वेची धडक लागून तो मयत झाला असल्याचा संदेश दिला.
घटनेची माहिती मिळताच सुपा पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत जागेचा व मृतदेहाचा पंचनामा केला. सुपा पोलिसांनी स्टेशन मास्तरांच्या तक्रारीवरून अकस्मात मृत्युची नोंद केली आहे. याबाबत सुपा पोलिसांनी सांगितले, मृत व्यक्ती 25 ते 27 वर्षीय वयाची असून रंग निमगोरा आहे.