Saturday, February 24, 2024
Homeअहमदनगरअहमदनगरकर सावधान ! पैसे भरले नाही तर फ्लेक्स झळकणार नगरच्या चौकाचौकांत

अहमदनगरकर सावधान ! पैसे भरले नाही तर फ्लेक्स झळकणार नगरच्या चौकाचौकांत

थकीत कर वसुलीसाठी महापालिकेने ७५ टक्के शास्ती माफी देऊनही महिनाभरात अवघी साडेनऊ कोटी रुपयांची वसुली झाल्याने आता महापालिका करबुडव्यांच्या नावांचे शहरात फ्लेक्स लावणार आहे.

याबाबत मनपा आयुक्त तथा प्रशासन डॉ. पंकज जावळे यांनी वसुली विभागाला आदेश दिले आहेत. शहरात १ लाखांपुढे थकबाकी असणाऱ्यांची तब्बल २ हजार ७१२ इतकी संख्या आहे.

मनपाने मालमत्ताधारकांना लोकअदालतीच्या निमित्ताने ३० नोव्हेंबर ते ९ डिसेंबरपर्यंत ७५ टक्के शास्तीमाफी जाहीर केली होती. दहा दिवसांत या योजनेचा ४ हजार ४१३ जणांनी लाभ घेत थकबाकीपोटी मनपाकडे ६ कोटी ७० लाख रुपयांचा भरणा केला,

त्यानंतर शास्तीमाफीच्या योजनेत ३१ डिसेंबरपर्यंत वाढ केली. उर्वरित २१ दिवसांत ३ कोटी १७ लाख २४ हजार अशी एकूण ९ कोटी ८७ लाख ६४ हजार रुपयांची वसुली झाली आहे. अद्याप मालमत्ताधारकांकडे तब्बल २०३ कोटींची थकबाकी आहे.

शहरात एकूण १ लाख ३१ हजार ३२८ इतके मालमत्ताधारक आहेत. यात निवासी मालमत्ता ८४ हजार ३४५, अनिवासी १६ हजार ४२७ तर मोकळ्या जागा ३० हजार ५५६ इतक्या आहेत. यातील बहुतांशी मालमत्ताधारक वर्षानुवर्षे मनपाकडे कर भरत नाहीत.

त्यामुळे त्यांची मूळ रक्कम आणि शास्ती असा आकडा वाढत जात आहे. या मालमत्ताधारकांकडे मागील १८४.५७ तर चालू २९.४२ अशी एकूण २१३.९९ कोटी रुपयांची थकबाकी आहे.

२७१२ जणांनी थकविले १०९ कोटी

शहरातील सर्वसामान्य नागरिक मनपाकडे नियमित कर भरतात मात्र, बहुतांशी व्यावसायिक आणि मोठे मालमत्ताधारक कर भरण्याकडे कानाडोळा करत आहेत. शहरातील २ हजार ७१२ मालमत्ताधारकांकडे तब्बल १०८ कोटी, ९१ लाख ५८ हजार रुपये इतकी थकबाकी आहे.

कोटीच्या पुढे थकबाकी असलेले २० जण

मनपाचा सर्वाधिक कर हा व्यावसायिक मोठ्या मालमत्ताधारकांनी थकविला आहे. यात शिक्षण संस्था, हॉटेल व्यावसायिक, कंपन्या, सरकारी कार्यालये यांनी थकविला आहे.

१ कोटीच्या पुढे थकबाकी असणाऱ्या मालमत्ताधारकांची संख्या २० इतकी आहे. करबुडव्यांची आता मालमत्ता जप्त करणार असल्याचे मनपाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले,

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments