अहमदनगरबाजारभाव

ahmednagar bajar bhav : जिल्ह्यातील बाजार समितीतीलकांदा व सोयाबीनचा वाचा सविस्तर

अहमदनगर जिल्ह्यातील राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) गुरुवारी लुज कांद्याला (Onion) प्रतिक्विंटलला 1300 रुपये इतका भाव मिळाला. तर सोयाबीनला (Soybeans) 6461 रुपये भाव मिळाला.

राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) गुरुवारी लूज कांद्याची आवक (Onion inward) झाली. कांदा नंबर 1 ला 950 ते 1300 रुपये, कांदा नंबर 2 ला 550 ते 850 रुपये, कांदा (Onion) नंबर 3 ला 251ते 500 रुपये, असा प्रति क्विंटलला भाव मिळाला.

सोयाबीनला (Soybeans) कमीत कमी 6179 रुपये, जास्तीत जास्त 6461 रुपये तर सरासरी 6375 रुपये. गव्हाला (Wheat) कमीत कमी 2129 रुपये, जास्तीत जास्त 2161 रुपये तर सरासरी 2150 रुपये भाव मिळाला. हरभरा कमीत कमी 3801 रुपये, जास्तीत जास्त 4387 रुपये तर सरासरी 4250 रुपये भाव मिळाला.

डाळिंबाच्या (Pomegranate) 3235 क्रेट्सची आवक झाली. डाळिंबाला (Pomegranate) नंबर 1 ला प्रति किलोला कमीत कमी 151 रुपये, तर जास्तीत जास्त 190 रुपये, डाळिंब नंबर 2 ला 91 ते 150 रुपये, डाळिंब (Pomegranate) नंबर 3 ला 51 ते 90 रुपये, डाळिंब (Pomegranate) नंबर 4 ला 10 ते 50 रुपये भाव मिळाला, अशी माहिती बाजार समितीचे सचिव उद्धव देवकर यांनी दिली.

Related Articles

Leave a Reply

Back to top button