अहमदनगर

अहमदनगर ब्रेकींग: ट्रकच्या धडकेत ११ वर्षांचा शाळकरी मुलाचा मृत्यू

अहमदनगर – नगर – दौंड महामार्गावर सकाळी बाबूर्डी बेंद (ता.नगर) फाट्यावर भरधाव वेगात चाललेल्या माल ट्रकने दुचाकीला धडक देऊन सुमारे १५० फुट फरफटत नेले. या अपघातात दुचाकीवरील ११ वर्षांचा शाळकरी मुलाचा मृत्यू झाला आहे. ओम सुनिल साळवे असे मयत मुलाचे नाव आहे. अपघातानंतर संतप्त गावकऱ्यांनी या महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले.

 

ओम साळवे चे वडील सुनिल साळवे हे रस्त्याच्या कडेला फेकले गेल्याने थोडक्यात बचावले आहेत. साळवे पिता-पुत्र हे त्यांच्या दुचाकीवर गुरुवारी सकाळी ८.४५ च्या सुमारास दुध आणण्यासाठी जात होते.

 

बाबुर्डी बेंद फाट्यावर ते महामार्गावर जात असताना श्रीगोंद्याकडून भरधाव वेगात आलेल्या मालट्रकने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. यावेळी दुचाकी चालविणारे सुनिल साळवे हे रस्त्याच्या बाजूला फेकले गेले तर पाठीमागे बसलेला ओम हा दुचाकीसह ट्रक खाली अडकून सुमारे १५० फुट लांब फरफटत गेला.

 

त्यात तो गंभीर जखमी झाला. स्थानिक नागरिकांनी त्याला ट्रक खालून बाहेर काढले. त्यास तातडीने उपचारासाठी नगर मधील खाजगी रुग्णालयात हलविले. मात्र उपचार सुरु असताना दुपारी त्याचा मृत्यू झाला.

Related Articles

Leave a Reply

Back to top button