अहमदनगर

अहमदनगर ब्रेकींग: महामार्गावर लष्कराच्या गाडीला अपघात

अहमदनगर- नगर-पुणे महामार्गावर चास कामरगाव घाटात लष्कराची सैनिक असलेली गाडी पलटी झाली. गाडीतील सैनिकांना सुदैवाने किरकोळ जखमा झाल्या आहेत. आज मंगळवारी दुपारी तीन ते चार वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली.

 

लष्कराच्या गाडीमध्ये सैनिक पुण्यावरुन नगरच्या दिशेने येत असताना चास कामरगाव घाटात श्वान आडवे आले. जवानांच्या गाडी चालकाने त्या श्वानांना वाचवण्याचा प्रयत्न केला. परंतु घाट उतार रस्ता व गाडीला असलेला वेग व वळण यामुळे गाडी पलटी झाली.

 

घटनेची माहिती कळताच नगर तालुका पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. रूग्णवाहीका व क्रेन ही ताबडतोब कामरगाव घाटात पाठवले. सर्व सैनिक सुखरूप बाहेर निघाले. त्यांना काही प्रमाणात जखमा झाल्या असुन त्यांना नगरला रुग्णालयात दाखल केले असुन सर्व सैनिक सुरक्षित आहेत. असेे नगर तालुका पोलिसांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button