अहमदनगर ब्रेकींग: ट्रॅक्टरच्या धडकेत दुचाकीस्वार ठार, एक गंभीर

अहमदनगर- पारनेर तालुक्यातील सांगवी सुर्या गावच्या शिवारात ट्रॅक्टर व दुचाकीची धडक होऊन झालेल्या अपघातात दुचाकीस्वार ठार तर एक गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी सकाळी 11.30 च्या सुमारास घडली.
तुकाराम शंकर माने (52) असे या अपघात मृत्यु झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर विठ्ठल मोहन झंझाड हे गंभीर जखमी झाले आहेत. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार हे दोघेजण आपल्या दुचाकीवरून सांगवी सूर्या येथून आपल्या घरी गांजीभोयरेकडे जात होते.
नाळीगोटी ओढयावर पावसाने रस्ता वाहून गेल्याने अरुंद रस्त्यावरून त्यांची गाडी जात असतांना त्याच वेळी वेगात समोरील वळणावरुन आलेल्या ट्रॅक्टरने खड्डा चुकविण्याच्या नादात माने यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली.
दुचाकीवर मागे बसलेले विठ्ठल झंझाड हे गंभीर जखमी झाले. त्यांनी रस्त्यावरून जाणार्या लोकांनी अपघाताची माहिती दिल्यानंतर स्थानिक नागरीकांनी तातडीने दोघांनाही रुग्णालयात उपचारासाठी हलविले. परंतु डॉक्टरांनी तुकाराम माने यांना मृत झाल्याचे सांगितले.
पारनेर पोलिसांनी आयुब इनामदार यांच्या फिर्यादीवरुन ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल केला असुन पारनेर पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक घनश्याम बळप यांच्या मार्गदर्शनाखाली जी.एन गायकवाड पुढील तपास करत आहे.