अहमदनगर

अहमदनगर ब्रेकींग: धोकादायक उतारावर पावसामुळे दुचाकी घसरली; युवक ठार

अहमदनगर- नगर-पुणे महामार्गावर अपघात होवून 21 वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची घटना कामरगाव (ता.नगर) शिवारात घडली आहे. वैभव गणेश कुलकर्णी (वय-21, रा. बळीराम पेठ, जळगाव) असे मयत युवकाचे नाव आहे. तो दुचाकीवर पुण्याहून नगरकडे येत असताना कामरगाव शिवारात असलेल्या धोकादायक उतारावर पावसामुळे रस्ता निसरडा झालेला असताना त्याची दुचाकी घसरली व तो जोरात रस्त्यावर आपटला.

 

त्यामुळे त्याच्या डोक्याला मार लागला. स्थानिक नागरिकांनी त्यास तातडीने सुपा येथील एका रूग्णालयात उपचारार्थ दाखल केले. त्यानंतर त्याच्या ओळखीच्या मंगल पोपट सोनाळे (रा. टाकळीढोकेश्‍वर, ता. पारनेर) व त्यांच्या दोन मुलांनी पुढील उपचारार्थ त्यास दुपारी 4.45 च्या सुमारास नगरच्या जिल्हा शासकीय रूग्णालयात हलविले. मात्र उपचारापूर्वीच तो मयत झाला असल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले.

 

याबाबत नगर तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास महिला पोलिस हेड कॉन्स्टेबल प्रमिला गायकवाड या करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button