अहमदनगर

अहमदनगर ब्रेकींग: कंटेनर- डंपरचा भीषण अपघात; तिघे ठार

अहमदनगर- नगर-औरंगाबाद राज्य महामार्गावरील दुभाजकानजिक उभ्या असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या डंपरला पाठीमागून कंटेनर धडकल्याने झालेल्या अपघातात दुभाजकावरील गवत काढण्याचे काम करणार्‍या दोघा मजुरांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना वडाळाबहिरोबा (ता. नेवासा) येथे आज घडली.

 

रमेश भगवान माने (वय 50 रा. बाभुळखेडा ता. नेवासा) व ऋषीकेश संजय निकम (वय 25 रा. सलाबतपूर ता. नेवासा) अशी मयत झालेल्या मजुरांची नावे आहेत.

 

अन्य एक मजुरही जखमी झाला असून तो उपचार घेत आहे. दरम्यान कंटेनरचालकाचाही यामध्ये मृत्यू झाल्याचे समजते. त्याचे नाव समजू शकले नाही.

 

नेवासा तालुक्यातील वडाळाबहिरोबा नजिक नगर-औरंगाबाद महामार्गावर रस्ता दुभाजकावर उगवलेले गवत सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मजुरांद्वारे काढून घेतले जात होते. काढलेले हे गवत भरुन नेण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचा डंपर दुभाजकानजिक नगरच्या दिशेने उभा केेलेला होता. ज्ञानेश रोलिंग वर्क्स समोर उभ्या असलेल्या या डंपरवर औरंगाबादहून नगरच्या दिशेने जात असलेला भरधाव कंटेनर मागच्या बाजूने धडकला. यात दुभाजकावर गवत काढण्याचे काम करत असलेले दोघे मजूर जागीच ठार झाले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button