अहमदनगर

अहमदनगर ब्रेकींग: भरधाव कारच्या धडकेत वृध्द ठार

अहमदनगर- भरधाव कारने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना काल कर्जत तालुक्यातील राशीन महामार्गावर घडली. बबन महिपती सुळ (57, रा. आखोणी ता. कर्जत) असे मयत झालेल्या वृध्द व्यक्तीचे नाव आहे.

याप्रकरणी कल्याण दत्तात्रय सुळ यांनी कर्जत पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बबन महिपती सुळ हे हिरो कंपनीची मोटारसायकल (एमएच 16, आरके 8197) वरून राशीनकडून आखोणीकडे जात होते.

त्यावेळी पाठीमागून भरधाव आलेल्या टोयोटा कंपनीची इनोव्हा कार (क्र. एमएच 31 एफयू 2524) या गाडीने त्यांना जोरदार धडक दिली. रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून भरधाव वेगाने गाडी चालवल्याने हा अपघात झाला.

या अपघातात मोटारसायकलचे नुकसान झाले असून बबन सुळ यांचा जागीच मृत्यू झाला.याप्रकरणी गाडीचा चालक साईनाथ शंकर हळदेकर (रा. वाकर, ता. भोकर, जि. नांदेड) याच्याविरुद्ध मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल काळे करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button