अहमदनगर

अहमदनगर ब्रेकींग: पायी जाणाऱ्या तरूणाचा वाहन धडकेत मृत्यू

अहमदनगर- रात्रीच्या वेळी रस्त्याने पायी जाणार्‍या तरूणाला वाहनाची धडक बसल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. केडगाव बायपास चौक ते अरणगाव बायपास चौक रोडवर ही घटना घडली.

 

संदीप रमेशकुमार सैनी (वय 27 रा. करोला, गुढगाव, राज्य हरियाणा, हल्ली रा. केडगाव) असे मयत तरूणाचे नाव आहे. मयत संदीपचा भाऊ प्रदीपकुमार रमेशकुमार सैनी यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात वाहन चालकाविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.

 

दरम्यान संदीपला कोणत्या वाहनाने धडक दिली. त्याचा मृत्यू कसा झाला याचा तपास कोतवाली पोलीस करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button