अहमदनगर

अहमदनगर ब्रेकींग: अज्ञात वाहनाच्या धडकेत चिमुकलीचा मृत्यू

अहमदनगर- एका अज्ञात वाहनाने धडक दिल्याने एका चार वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाला आहे. श्रीरामपूर शहरातील बेलापूररोडवर जयविजय सर्व्हीस स्टेशनजवळ पहाटेच्या दरम्यान हा अपघात झाला. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

 

शहरातील बेलापूररोडवर जयविजय सर्व्हीस स्टेशनजवळ पहाटेच्या दरम्यान चांदनी सोपान भोसले (वय 4) या चिमुकलीला एका अज्ञात वाहनाने धडक दिल्याने तिचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होवून पंचनामा करुन माहिती घेतली.

 

मात्र हा अपघात नेमका कधी झाला याची माहिती मिळू शकली नाही. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात आकस्मात मूत्यूची नोंद करण्यात आली होती.

Related Articles

Leave a Reply

Back to top button