अहमदनगर ब्रेकींग: अज्ञात वाहन- दुचाकीच्या भीषण अपघातात दोन तरूण ठार; एक जखमी

अहमदनगर- अज्ञात वाहन व दुचाकीचा अपघात होऊन पाथर्डी तालुक्यातील सुसरे येथील दोन युवकांचा जागीच मृत्यू तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.
नामदेव बबन आठरे (वय २८), विजय मारूती मिसाळ (वय २२ रा.सुसरे) असे अपघातात मृत झालेल्या दोन तरुणांची नावे आहेत. तर आदेश शेषराव कंठळी (वय २१) हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे.
ही अपघाताची घटना शनिवारी रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास अमरापुर- सुसरे रोडवरील म्हसोबा वस्ती नाजिक घडली आहे.
अपघातानंतर या तिघांना उपचारासाठी शेवगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारापूर्वीच आठरे व मिसाळ यांचा मृत्यू झाला होता. अज्ञात वाहन व दुचाकीची इतकी जोरदार धडक झाली की या अपघातात दोन्ही तरुण जागीच मृत पावले.
मृत नामदेव आठरे या तरुणाला अवघ्या चार महिन्याची एक मुलगी आहे. या अपघातानंतर संपूर्ण सुसरे गावावर मोठी शोककळ पसरली आहे. पुढील तपास पाथर्डी पोलीस करत आहे.