अहमदनगर

अहमदनगर ब्रेकींग: वाहनाची दुचाकीला धडक; युवक ठार

अहमदनगर- दुचाकीवरून जात असताना वाहनाची धडक लागून झालेल्या अपघातात युवक ठार झाला. अनिल कुमार (वय 19 मुळ रा. कसिरा पश्चिम, उत्तरप्रदेश हल्ली रा. हॉटेल यश, केडगाव, अहमदनगर) असे मयत युवकाचे नाव आहे.

अनिल याला अपघातानंतर जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

केडगाव बायपास शिवारातील कांदा मार्केट जवळून दुचाकीवरून जात असताना रात्री आठच्या दरम्यान अनिलकुमार यांच्या दुचाकीचा अपघात झाला होता. अपघातात अनिलकुमार गंभीर जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी जिल्हा रूग्णालयात नेले होते.

तेथील डॉक्टरांनी उपचारापूर्वीच अनिलकुमार यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. जिल्हा रूग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह अनिलकुमार यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात अंत्यविधीसाठी देण्यात आला. कोतवाली पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button