अहमदनगर ब्रेकिंग : 14 वर्षीय शालेय विद्यार्थीनी तीन महिन्यांची गरोदर.! नराधमाने…

संगमनेर तालुक्यातील पठार भागावर जवळेबळेश्वर परिसरात 14 वर्षीय शालेय मुलीला जीवे मारण्याची धमकी देऊन वेळोवेळी अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही मुलगी तीन महिन्याची गरोदर असल्याने हा प्रकार समोर आला आहे.
याप्रकरणी पिडीत मुलीच्या पालकांनी दिलेल्या फिर्यादीनुसार घारगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर पोलिसांनी मयुर मोहन कौटे (रा. कौटेवाडी, ता. संगमनेर) यास अटक केली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे कि पीडित मुलगी इयत्ता 9 वी. मध्ये शिक्षण घेत होती. ती जवळच असणाऱ्या एका आश्रम शाळेत शिक्षण घेण्यासाठी जात होती. आरोपी या आश्रम शाळेच्या परिसरात राहत असल्याने तिच्यावर आरोपी मयुर याची नेहमी नजर राहत होती.
मात्र, एक व्यक्ती म्हणुन त्याची तिच्यावर वाईट नजर आहे. हे पिडीत बलिकेच्या लक्षात आले नाही. आरोपी मयुर हा दर 8 ते 10 दिवसांनी पिडीत मुलीच्या घरी जाऊन तिच्याशी बोलत होता. या दरम्यान, आरोपी याने तिच्या अज्ञानपणाचा फायदा घेत तिच्यासोबत लगट करण्याचा प्रयत्न केला.
रम्यान, गेली चार महिन्यांपासुन वेळोवेळी या बलिकेला गाठून आरोपी मयुर याने तिच्यावर अत्याचार केले आहेत. पिडीत मुलीच्या पालकांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की,
पिडीत मुलगी गावातील किराणा दुकानात काही वस्तु घेण्यासाठी गेली असता रात्रीचे 7:30 च्या सुमारास पिडीत मुलीचा हात धरून एका आश्रमशाळेच्या आवारात नेऊन आरोपी मयुर याने तिला शरीर संबंध ठेवण्यास प्रेरित करून बलात्कार केला.
घडलेला प्रकार जर कोणाला सांगशील तर तुला मारून टाकेल. अशी धमकी देऊन निघुन गेला. त्यानंतर पुन्हा 8 ते 10 दिवसांनी रात्रीच्या वेळी एकटी असल्याचा फायदा उचलत शेतात तिच्यावर पुन्हा अत्याचार केला.
दरम्यान, आरोपी मयुर याने धमकी दिल्यामुळे मुलगी काही बोली नाही. मात्र, जेव्हा शरीर संबंध झाल्यानंतर चार महिने निघुन गेले. त्यानंतर मुलीला ताप व खोकला आला. त्यामुळे, पिडीत मुलीच्या मोठ्या बहिणीने डॉक्टरांकडे नेले. डॉक्टरांनी तपासणी केली असता.
यात डॉक्टरांनी सांगितले की, ती तीन महिन्यांची गरोदर आहे. त्यानंतर गेल्या काही दिवसांनपुर्वी जो काही प्रकार घडला तो मुलीने पालकांपुढे कथन केला. त्यानंतर मुलीला घेऊन तिच्या पालकांनी थेट पोलीस ठाणे गाठले. त्यानंतर आरोपी मयुर कौटे याच्यावर घारगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.