अहमदनगर

अहमदनगर ब्रेकींग: 16 वर्षीय युवतीला पळविले

अहमदनगर- नगर तालुक्यातील एका गावातील कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या 16 वर्षिय युवतीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याची घटना समोर आली आहे.

 

याबाबत सदर युवतीच्या वडिलांनी नगर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांची 16 वर्षिय मुलगी नगर तालुक्यातील एका गावात कनिष्ठ महाविद्यालयात इयत्ता 11 वी मध्ये शिक्षण घेत आहे. सोमवारी सकाळी ती शाळेत गेली असता अज्ञात व्यक्तीने तिला कशाचे तरी अमिष दाखवून फूस लावून पळवून नेले.

 

याबाबत माहिती मिळाल्यानंतर तिच्या कुटुंबियांनी तिचा परिसरात सर्वत्र शोध घेतला. मात्र ती मिळून न आल्याने सायंकाळी तिच्या वडीलांनी नगर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात इसमाविरूध्द भादंवि कलम 363 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button