अहमदनगर ब्रेकिंग : पोलिसांकडून जिल्ह्यातील ३६५ गुन्हेगार हद्दपार ! हे आहे कारण
शहरातील गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांचा शोध घेऊन त्यांना वेगवेगळ्या कलमांनुसार नोटिसाही बजावण्यात येत आहेत. ज्यांच्यामुळे या काळात कायदा आणि सुव्यवस्थेला धोका निर्माण होऊ शकतो,

मोहरमच्या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनाकडून जोरदार तयारी करण्यात आली असून, शहरातील ३६५ जणांना तीन दिवसांसाठी हद्दपार करण्यात आले आहे. तशा नोटिसा पोलिसांकडून बुधवारी बजावण्यात आल्या आहेत.
मोहरमच्या पार्श्वभूमीवर पोलिस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांकडून तयार सुरू आहे. या काळात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी गेल्या काही दिवसांपासून कोतवाली तोफखाना आणि भिंगार कॅम्प पोलिसांकडून शांतता समित्याच्या बैठका घेऊन सूचना करण्यात आल्या आहेत.
कायदा आणि सुव्यवस्थेला धोका
शहरातील गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांचा शोध घेऊन त्यांना वेगवेगळ्या कलमांनुसार नोटिसाही बजावण्यात येत आहेत. ज्यांच्यामुळे या काळात कायदा आणि सुव्यवस्थेला धोका निर्माण होऊ शकतो, अशा व्यक्तींना पुढील तीन दिवस शहरात प्रवेश बंदी करण्यात आली आहे. मोहरम काळात प्रवेश बंदी असलेल्यांची संख्या ३६५ इतकी असून, त्यांना नोटिसा बजावण्यात येत आहेत.
मोहरमच्या काळात कडेकोट बंदोबस्त
मागील काही दिवसांपासून नगर शहरात खून व प्राणघातक हल्ले, यासारखे प्रकार घडत आहेत. त्यापूर्वीही दोन गटात भांडण होऊन शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. शहरातील कायदा व सुव्यवस्थेबाबत माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी अधिवेशनात सरकारला धारेवर धरले होते. त्यामुळे मोहरमच्या काळात कडेकोट बंदोबस्तासह मोहरम मिरवणूक मार्गावर ठिकठिकाणी बॅरिकेड्स लावण्यात आलेले आहेत. तसेच या मार्गावर सीसीटीव्ही बसविण्यात आले असून गुन्हेगारांवर कारवाया करण्यात येत आहेत.
गुन्हेगारांवर पोलिसांची नजर
पोलिस अधीक्षक ओला यांच्या मार्गदर्शनाखाली कोतवाली, तोफखाना आणि भिंगार कॅम्प पोलिसांनी भादंविकलम १०७ नुसार ९१, भादंवि कलम १६, भादंवि कलम १४४ (२) अन्वये ३६५, भादंवि १४९ नुसार १७७ जणांना नोटिसा बजावण्यात आलेल्या आहेत.
गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांचा शोध घेऊन त्यांना नोटिसा
पोलिस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली मोहरमची तयारी सुरू आहे. बंदोबस्ताबरोबरच गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांचा शोध घेऊन त्यांना नोटिसा बजावण्यात आलेल्या आहेत. त्यांना पुढील तीन दिवस शहरात बंदी घालण्यात आलेली आहे. अनिल कातकडे, पोलिस उपअधीक्षक, शहर
अहमदनगर जिल्ह्यातील सर्व महत्वाच्या बातम्या वाचा इथे क्लिक करून