अहमदनगर

अहमदनगर ब्रेकिंग : भीषण अपघातात ६ जागीच ठार ! जिल्ह्यातील धक्कादायक घटना…

अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील डाऊच खुर्द परिसरात झगडे फाटा कोपरगाव महामार्गावर कंटेनरने रिक्षाला जोरदार धडक दिली.

हा अपघात इतका भीषण होता की अ‍ॅपे रिक्षा पूर्ण चक्काचुर झाली. या अपघातात दोन कॉलेजमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनी, दोन महिला व दोन पुरुषांचा जागीच मृत्यू झाला.

ॲपे रिक्षा मधील चार जण गंभीर जखमी झाले आहेत. याबाबत समजलेली माहिती अशी की झगडेफाट्यावरून ॲपे रिक्षा पॅसेंजर घेऊन कोपरगावकडे जात असताना पगारे वस्ती जवळ कोपरगावहुन येत असलेल्या कंटेनरने जोरात धडक दिली.

या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला असून दोन या कंटेनरने दोन मोटरसायकल स्वारांना देखील चिरडले आहे ते देखील गंभीर जखमी झाल्याचे समजते.

Related Articles

Leave a Reply

Back to top button