अहमदनगर

अहमदनगर ब्रेकींग: ‘या’ नावाजलेल्या बॅंकेत बनावट सोने तारण घोटाळा

अहमदनगर- अर्बन बँकेनंतर शहर सहकारी बँकेतही खोटे सोने तारण ठेवून कर्ज घेतल्याचा प्रकार झाल्याने सभासदांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. अहमदनगर शहर सहकारी बँकेच्या सोने तारण विभागात 26 लाख 63 हजार रुपयांचा घोटाळा झाल्याचे समोर आला आहे.

 

या प्रकरणी शहर सहकारी बँकेचे मॅनेजर दिनेश कुलकर्णी यांच्या फिर्यादीवरून विशाल चिपाडे, ज्ञानेश्वर कुताळ, सुनील आळकुटे, अजय कापाले यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

 

हा मोठा घोटाळा झाल्याचे समोर आले आहे. शहर सहकारी बँकेत खोटे सोने तारण ठेवून कर्ज प्रकरण करून बँकेला फसवल्याची धक्कादायक गोष्ट समोर आली आहे. खोटे सोने ठेवून लाखो रुपयांचे कर्ज घेण्याचा हा प्रकार समोर आला आहे.

 

यावर आता पोलीस तपास करणार असून या घोटाळ्यामध्ये अजून कोण सामील आहेत का याबाबत पोलीस तापासामध्ये सर्व बाबी समोर येतील. या गुन्ह्याचा तपास पीएसआय गजानन इंगळे करत आहेत.

 

गेल्या तीन दिवसांपासून पोलीस अत्यंत गोपनीय पद्धतीने या प्रकरणाचा तपास करत होते. अखेर बुधवारी रात्री कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button