अहमदनगर

अहमदनगर ब्रेकींग:अल्पवयीन मुलीला शाळेतून पळवून नेऊन धर्मांतर करत अत्याचार

अहमदनगर- अल्पवयीन मुलीला शाळेतून पळवून नेऊन तिचे जबरदस्तीने धर्मांतर केले. तिच्यावर वेळोवेळी अत्याचार केला व बळजबरीने निकाहही केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेने परिसरासह शहरातील पालक वर्गात खळबळ उडाली आहे.

 

याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलिसांनी इम्रान कुरेशी उर्फ मुल्ला कटर (वय 35 रा. वार्ड नं. 2, श्रीरामपूर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे इम्रान कुरेशी हा विवाहित आहे.

 

श्रीरामपूर शहरातील एक 16 वर्षीय अल्पवयीन मुलीला इम्रान कुरेशी उर्फ मुल्ला कटर याने तिचे शाळेतून अपहरण केले व जबरदस्तीने उचलून नेवून धर्मपरिवर्तन करून तिच्यासोबत निकाह केला. तसेच इमरान कुरेशी याने वेळोवेळी जबरदस्तीने शरीरसंबंध केल्यामुळे ही अल्पवयीन विद्यार्थिनी गर्भवती झाली. तरीही त्याने धमकी देऊन बळजबरीने तिच्यावर अत्याचार करीत राहिला. अशी फिर्याद पीडित विद्यार्थिनीच्या नातेवाईकांनी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात दिली. या फिर्यादीवरुन इमरान कुरेशी उर्फ मुल्ला कटर याच्या विरुद्ध अपहरण, अत्याचारासह, बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम व अॅट्रॉसिटी कायद्यातील कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

 

पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली इम्रान कुरेशी उर्फ मुल्ला कटर याला श्रीरामपूर शहर पोलिसांनी तातडीने अटक केली. पोलीस उपअधिक्षक मिटके तपास करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button