अहमदनगर ब्रेकींग: युवतीवर अत्याचार करून दिल्या गर्भपाताच्या गोळ्या

अहमदनगर- नगर शहरातील एका उपनगरात राहणार्या महाविद्यालयीन युवतीला (वय 20) लग्नाचे अमिष दाखवून तिला सुपा (ता. पारनेर) येथील हॉटेलमध्ये नेऊन अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. अत्याचारानंतर तिला बळजबरीने गर्भपाताची गोळी खाऊ घातली. याप्रकरणी केडगाव मधील आंधळे नामक तरूणाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पीडित युवतीने कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून हा गुन्हा सुपा पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे.
केडगाव येथील तरूणाने पीडित युवतीला लग्नाचे अमिष दाखवून तिला गाडीवर बळजबरीने बसवत सुपा येथील एका हॉटेलमध्ये नेले व तेथे तिच्यावर अत्याचार केला. ही घटना 2 सप्टेंबर रोजी दुपारी 12 ते 2 या वेळेत घडली होती. त्यानंतर त्या पीडित युवतीला आरोपीने बळजबरीने गर्भपाताच्या गोळ्या खाऊ घातल्या. त्यामुळे त्या युवतीची गर्भनलिका खराब झाल्याचे डॉक्टरांनी निदान केले. त्यानंतर सदर पीडित युवतीने याबाबत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.