अहमदनगरलेटेस्ट

अहमदनगर ब्रेकिंग ; जेजुरीला जाणाऱ्या भाविकांचा अपघात ! महिलेचा मृत्यू तर …

जेजुरीला देवदर्शनासाठी जात असलेल्या नाशिक जिल्ह्यातील पंचवटी येथील भाविकांच्या वाहनाला अज्ञात वाहनाने धडक दिली. यात एक वृध्द महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर सहा जण गंभीर जखमी झाले.

ही घटना नाशिक – पुणे महामार्गावर संगमनेर तालुक्यातील बोटा (माळवाडी) परिसरात सोमवारी (दि. १४) पहाटे सव्वा तीन वाजलेच्या सुमारास घडली.

वैभव योगेश गिरी (वय२५) , आकाश दत्ता खोडे (वय२१ ),पुजा दत्तात्रय खोडे (वय२३), प्रिया शरद आंबेकर (वय२३), चेतन गणेश शिंदे (वय१०), ताराबाई दत्तात्रय खोडे (वय३५ ) अशी अपघातात जखमी झालेल्यांची नावे आहेत.

तर उपाचारादरम्यान जनाबाई पुंडलिक खोडे (वय६५) यांचा मृत्यू झाला आहे. हे सर्वजण नाशिक जिल्ह्यातील पंचवटी येथील रहिवाशी आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, नाशिक जिल्ह्यातील पंचवटी येथील भाविक पुणे जिल्ह्यातील जेजुरी येथे खंडोबा महाराजांच्या दर्शनासाठी टेम्पो (छोटा हत्ती क्र.एम.एच.१५ जी. व्ही. ५३२८ ) ने जात होते.

दरम्यान ते पहाटे संगमनेर तालुक्यातील बोटा (माळवाडी) परिसरात आले असता अज्ञात वाहनाने भाविकांच्या टेम्पोला जोरदार धडक दिली.

यात एक वृध्द महिलेचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला असून सहा जण गंभीर जखमी झाले. आजूबाजूच्या नागरिकांनी धाव घेत जखमींना उपचारासाठी आळेफाटा येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले. यात टेंपोचेही मोठे नुकसान झाले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button