अहमदनगर ब्रेकींग: विवाहितेला आधी गर्भपाताच्या गोळ्या खाऊ घातल्या अन् नंतर…

सासरी नांदत असलेल्या विवाहितेला बळजबरीने गर्भपाताच्या गोळ्या खाऊ घालुन मारहाण केली. 8 मार्च, 2022 रोजी सकाळी 10 ते 22 मार्च, 2022 रोजी सकाळी साडेदहा वाजेच्या दरम्यान नगर-कल्याण रोडवरील शिवाजीनगर येथे ही घटना घडली.
या प्रकरणी विवाहितेने बुधवारी तोफखाना पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली आहे. दिलेल्या फिर्यादीवरून विवाहितेचा पती, सासु-सासरे, नणंद-नंदई अशा पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी विवाहिता सासरी नांदत असताना नणंद आणि सासुने तिला बळजबरीने गर्भपाताच्या गोळ्या खाऊ घालुन मारहाण केली. ‘तु जर कोणाला काही सांगितले तर तुला नांदवणार नाही’, असा दम दिला. पती, सासरे व नंदई यांनी देखील विवाहितेला शिवीगाळ करून मारहाण केली.
सासरे यांनी वडिल व मामा यांना फोन करून, ‘तुमची मुलगी घेऊन जा’, असे सांगितले. वडिल व मामा घरी आले असता सासर्याने मामाला लाकडी दांडक्याने मारहाण केली.
वडिलांना शिवीगाळ, दमदाटी केली असल्याचे विवाहितेने फिर्यादीत म्हटले आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस नाईक गणेश चौधरी करीत आहेत.