अहमदनगर ब्रेकींग: कृषी पर्यवेक्षक लाचेच्या जाळ्यात

अहमदनगर- वाहेगाव येथे कृषी विभागाच्या पॉवर ट्रीलर व स्प्रींकलरवर शासनाची सबसिडी मिळविण्यासाठी प्रत्यक्ष पाहणी नंतर ते मंजूर करून पुढे सादर करण्यासाठी तीन हजाराची लाच स्वीकारताना कृषी पर्यवेक्षक श्यामकुमार ज्ञानदेव काळे यांस लाचलुचपत विभागाने रंगेहाथ पकडले.
गंगापूर तालुक्यातील वाहेगाव येथील तक्रारदार शेतकरी यांच्या वडिलांच्या नावावर कृषी यांत्रीकीकरण योजनेंतर्गत पॉवर ट्रीलर व स्प्रींकलर मंजूर झाले. त्यामुळे तक्रारदार यांनी खरेदी केलेल्या पॉवर ट्रीलर व स्प्रींकलरवर सबीडी मिळविण्यासाठी प्रत्यक्ष पाहणीनंतर मंजूरीसाठी ते पुढे सादर करण्यासाठी कृषी पर्यवेक्षक श्यामकुमार ज्ञानदवे काळे याने 5 हजाराची मागणी तक्रारदाराकडे केली होती.
तडजोडीअंती 3 हजार देण्याचे ठरले. तक्रारदार यांना लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत विभागाशी संपर्क साधला. लाचलुचपत विभागाने लाच मागणीच्या तक्रारीची पडताळणी केली. त्यानंतर वाहेगाव येथील हिवाळेे वस्तीवर 3 हजाराची लाच स्वीकारताना श्यामकुमार काळे यांस रंगेहाथ पकडले. श्यामकुमार काळे हे श्रीरामपूर तालुक्यातील खोकर येथील मुळचे रहिवाशी आहेत.
सदरची कारवाई कारवाई पोलीस निरीक्षक दिपाली निकम, पोलीस नाईक सुनिल पाटील, सुनिल पवार व विलास चव्हाण आदींनी केली.